शनिवार, ४ जुलै, २००९

तांबडा रस्सा ( मालवणी पद्धत )



१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे )
५ कांदे , ३ टमाटो , ५ पाकळ्या लसूण , आलं , लिंबाचा रस .
सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , मीठ लाल तिखट , हळद , तेल इ.

मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून १ तास ठेवावे.
कढई मधे तेल गरम करून त्यात प्रथम सुखं खोबरं लालसर भाजून घ्यावे मग त्यात लाल सुखी मिरची घालावी, मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात अख्खा गरम मसाला (धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र) घालावे. गार झाल्यावर मिक्सरमधून थोडं जाडसरंच वाटावे.( फार पाणी घालू नये ).
एका पितळी पातेल्यामधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे , कांदा चांगला लाल होत आला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालून अजून चांगले परतावे. मग त्यात बारेक चिरलेला टमाटो घालावा आणि हे सर्व मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत परतावे ( मग त्याचा एक खमंग असा सुवास येईल )
मग त्यात मटण घालून मटणाला पाणी सुटेपर्यंत ( होय !! मटणाला ह्ळू हळू पाणी सुटायला लागेल) परतत रहावे. अगदी गरज असल्याशिवाय बाहेरचे पाणी घालू नये.त्याच पाण्यात मटण लवकर शिजते.
मटण शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला घालून परत १० मिनीटे चांगले परतून मग त्यात पाणी घालावे. पाणी थोडं जास्तंच असू द्या.
चांगलं ऊकळल्यावर त्यात ओलं खोबरं आणी काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्यावी आणि घालावी. चवीप्रमाणे मीठ आणी लिंबाचा रस घालावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा