सोमवार, २६ एप्रिल, २०१०

आवळा च्‍यवनप्राश

साहित्‍यः- मोठया आकाराचे आवळे1 किलो,खडी साखर 1.50 किलो,2 जायफळ,जावत्रि,इलायची दाने,लेंडीपिपळी,नागकेशर प्रत्‍येकि 5 ग्रम,लंवग,सुंठ,पांढरेमिरे,
किसमिस प्रत्‍येकि 10 ग्रम,20ग्रम काजु,50ग्रम अष्‍टवर्ग,250ग्रम साजुक तुप.
कृतिः- काजु व किसमिसचे तुकडे करावे.जायफळची पावडर करुन घ्‍यावी. तसेच इतर सामग्रीची वस्‍त्र गाळपावडर करावी.आवळे कुकरमध्‍ये पाणी टाकुन एकाभंडयात आवळे ठेवुन शिजवावे आवळे शिजल्‍यावर त्‍यातील बिया काढुन त्‍याचा लगदा करावा. कढई गरम करायला ठेवावी व त्‍यात तुप टाकावे . ते गरम झाल्‍यावर त्‍यात आवळयाचा लगदा गुलाबी होइपर्यात परता 1लिटर पाण्‍यात खडी साखर टाकुन त्‍याचा 1तारी पाक तयार करा. त्‍यात आवळयाचा लगदा चांगला मिसळा त्‍यात जायफळ
पावडर व इतर साहित्‍य एकत्र करा. थंड झाल्‍यावर काजु किसमिस टाका. जास्‍त घट्ट झाल्‍यास मध टाकावे.

राजमा मसाला

साहित्य : 250 ग्रॅम राजमा, 2 कांदे चिरलेले, 1 कप दही, 2 कप कापलेली हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, तिखट प्रत्येकी अर्धा चमचा, 1 चमचा धने पूड, 1 चमचा क्रीम, 2 मोठे चमचे तेल, 1 चिमटी सोडा, 1 तुकडा कापलेलं आलं, मीठ चवीनुसार.


कृती : राजमाला रात्री सोडा मिसळलेल्या पाण्यात भिजत घालावे. त्याच पाण्यात सकाळी उकळावे
. फ्राइंग पैनमध्ये तूप गरम करून कांदा फ्राय करून त्यात आलं व हिरवी मिरची घालून दोन मिनिट परतावे. दह्याला घोटून त्यात हळद, धने पूड, मीठ व तिखट घालावे. एक मिनिटांनंतर पाण्यासहित राजमा डाळीत टाका आणि हलकेसे घोटा. दोन वेळा उकळी आल्यावर गरम मसाला, क्रीम टाकून काही वेळ झाकून ठेवा नंतर साध्या भात किंवा फुलक्यांसोबत वाढावे.

चिकन बिर्याणी

साहित्य : 1 किलो तांदूळ, एक किलो चिकन, २५० ग्रॅम रिफाइंड तेल, ५०० ग्रॅम चिरलेला कांदा, 1 कप टोमॅटो चिरलेले, एक कप दही, १०-१५ हिरव्या मिरच्या लांब लांब कापलेली, 5 ग्रॅम दालचिनी, वेलची व लवंगा, एक मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.

कृती : तांदूळ स्वच्छ करून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावे. तेल गरम करून त्यात कांदे परतून घ्यावे, नंतर त्यात हिरव्या मिरच्या, वेलची, दालचिनी, लवंगा घालून चांगले परतून घ्यावे.

कांदे चांगले परतून झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावे व टोमॅटो घालून परतून घ्यावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे, दही व मीठ घालावे. चिकनला शिजू द्यावे त्यात तांदूळ व पाणी घालून वर झाकण ठेवून भात चांगला शिजवुन घ्‍यावा.

मैसूर पाक

साहित्य : 200 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम तूप.

कृती : बेसन आणि चार मोठे चमचे तूप मिसळावे आणि त्याला चांगल्याप्रकारे परतावे. खाली काढून वेगळे ठेवावे. साखरेत एक कप पाणी टाकून पातळ चाशनी बनवावी. साखरेची चाशनी तयार झाल्यानंतर कमी आच करून थोडे भाजलेले बेसन मिसळून सारखे हालवावे. ह्याच प्रकारे सर्व बेसन संपेपर्यंत हिच प्रक्रिया करावी. नंतर मिश्रणाला हालवत थोडे-थोडे करून सर्व तूप टाकून द्यावे. आंचेवरून काढून तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकावे आणि त्याला समातलं करावे. मिश्रण थंडे झाल्यावर मनासारख्या आकारात कापावे. जास्तीचे तूप वेगळे करून घ्यावे.

ब्रेडचे गुलाबजाम

साहित्य : 1 पॅकेट ताजी ब्रेड, 1 वाटी साय, 50 ग्रॅम अरारोट, 250 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम साखर.


कृती : ब्रेडचे कोपरे कापून घ्यावे व ब्रेडचा बारीक चुरा करून साय व अरारोटत्यात मिक्स करून एकजीव करावे.
या मिश्रणाचे गोल गोल गोळे करून तुपात तळून घ्यावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात तळलेले गोळे टाकावे. 5 मिनिट ठेवून बाहेर काढावे. स्वादिष्ट ब्रेडचे गुलाबजाम तयार आहे.

ब्रेडचे गुलाबजाम

साहित्य : 1 पॅकेट ताजी ब्रेड, 1 वाटी साय, 50 ग्रॅम अरारोट, 250 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम साखर.


कृती : ब्रेडचे कोपरे कापून घ्यावे व ब्रेडचा बारीक चुरा करून साय व अरारोटत्यात मिक्स करून एकजीव करावे.
या मिश्रणाचे गोल गोल गोळे करून तुपात तळून घ्यावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात तळलेले गोळे टाकावे. 5 मिनिट ठेवून बाहेर काढावे. स्वादिष्ट ब्रेडचे गुलाबजाम तयार आहे.