सोमवार, २६ एप्रिल, २०१०

ब्रेडचे गुलाबजाम

साहित्य : 1 पॅकेट ताजी ब्रेड, 1 वाटी साय, 50 ग्रॅम अरारोट, 250 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम साखर.


कृती : ब्रेडचे कोपरे कापून घ्यावे व ब्रेडचा बारीक चुरा करून साय व अरारोटत्यात मिक्स करून एकजीव करावे.
या मिश्रणाचे गोल गोल गोळे करून तुपात तळून घ्यावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात तळलेले गोळे टाकावे. 5 मिनिट ठेवून बाहेर काढावे. स्वादिष्ट ब्रेडचे गुलाबजाम तयार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा