मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

रव्याचे लाडू

साहित्य:
२ वाट्या बारीक रवा
१ वाटी पाणी
दिड वाटी साखर
१/२ वाटी साजूक तूप
१ लहान चमचा वेलची पूड

कृती:
१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.
२) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. (किंवा साखरेचा पाक पारदर्शक झाला कि एक उकळी काढून लगेच उतरवावा.) भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी.
३) हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. काही तासांनी मिश्रण आळते. मग लाडू वळावेत.

टीप:
१) जर लाडवाचे मिश्रण फळफळीत झाले तर अर्धी वाटी पाणी लहान पातेल्यात उकळावे. त्यात २-३ चमचे साखर घालावी. पाक बनवून तो मिश्रणात घालावा. मिक्स करावे. थोड्या वेळाने लाडू वळावेत.
२) रव्याच्या लाडवांसाठी शक्यतो बारीक रवा घ्यावा.

बेसन लाडू

साहित्य:
दिड कप बेसन
साधारण पाऊण कप तूप (वितळवलेले)
३/४ कप पिठी साखर (किंवा गरजेनुसार)
१/२ टिस्पून वेलचीपूड
३ टेस्पून दूध
बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे आवडीनुसार

कृती:
१) बेसन तूपामध्ये मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे (साधारण ३५ ते ४० मिनीटे). भाजताना सारखे ढवळत राहावे. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि साधारण ५ ते ७ मिनीटांत पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये.
२) दुध न घालता:
बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. बेसन पूर्ण गार होवू द्यावे. साधारण २ तास तरी साखर घालू नये. नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार साखर घालावी. निट मिक्स करून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.

तरीही बेसन गरम असतानाच थोडे दुध घातले तर शक्यतो लाडू चुकत नाहीत. त्याची कृती पुढीलप्रमाणे.
२) दुध घालून:
बेसन व्यवस्थित भाजले गेले आणि खमंग वास आला कि गॅस बंद करावा आणि दुधाचा हबका मारावा. यामुळे बेसन चांगले फुलेल (आधी फसफसेल) आणि घट्टसर होईल. हे बेसन लगेच दुसर्‍या भांड्यात काढून ठेवावे. साधारण २० मिनीटांनी यात सुका मेवा, वेलचीपूड आणि साखर घालून हलके मळून ठेवून द्यावे. गार झाले कि लाडू वळावेत.

शंकरपाळे

साहित्य:
१/४ कप दूध
१/४ कप तूप
१/४ कप साखर
साधारण दिड कप मैदा

कृती:
१) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. हे मिश्रण थंड करून घ्यावे.
२) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.
३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.

अनारसे

साहित्य:
१ कप तांदूळ
१ कप किसलेला गूळ
१ चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तूप / तेल

कृती:
१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
४) ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
६) अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो (हसतो). तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पिठ ५-६ महिने सहज टिकते.
७) अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.

चकली ...

चकली भाजणी -
वाढणी : साधारण दिड किलो

साहित्य:
दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:
१) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी वेगवेगळ्या ब्राऊन रंग येईस्तोवर भाजून घ्यावेत. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व ईतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे। थंड झाले कि बारीक दळून आणावे.
साहित्य:
१ कप भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

Sambar

FISH CURRY

Kolhapuri Chicken

Achari Vange

२ ते अडीच वाट्या वांग्याच्या फोडी
२-३ चमचे आंब्याचे लोणचे
१ लहान कांदा बारीक उभा चिरून
३-४ चमचे शेंगदाण्याचा कूट
१ चमचा धणेपूड
१ चमचा जिरेपूड
फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहोरी, जीरे, हिंग, हळद
१ चमचा लाल तिखट
कढीपत्ता
१ चमचा उडीद डाळ
बडीशेप
२ चमचे काजूचे तुकडे
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) वांग्याच्या फोडींना आधी लोणचे, धणेपूड, जिरेपूड लावून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता, थोडी बडीशेप घालून फोडणी करावी. काजूचे तुकडे, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ गोल्डन ब्राऊन झाली कि कांदा घालावा.
३) कांदा परतला कि त्यात धणे-जिरेपूड आणि लोणचे लावलेल्या वांग्याच्या फोडी घालाव्यात. शेंगदाण्याचा कूट घालावा. वांग्याच्या फोडी थोड्या परतल्या कि वरती झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढावी. चव बघूनच मिठ घालावे कारण लोणच्यात भरपूर मीठ असतेच. चिरलेली कोथिंबीर घालावी.
-http://chakali.blogspot.com/

राजमा मसाला

साहित्य:
३/४ ते १ कप राजमा (रेड बिन्स)
१ टिस्पून ते दिड टिस्पून आलेलसूण पेस्ट
३/४ कप कांदा, बारीक चिरून
३ मध्यम टोमॅटो
१ ते २ टेस्पून तेल
१ तमालपत्र
१ इंच दालचिनी तुकडा
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट (शक्य असल्यास काश्मिरी)
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून आमचुर पावडर
१/२ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ


कृती:
१) राजमा पाण्यात ६ ते ७ तास भिजत ठेवावा. प्रेशरकूक करून मऊसर शिजवून घ्यावा. खुप जास्त शिजवू नये नाहीतर दाणे फुटून करी चांगली लागणार नाही. शिजवताना मिठ घालावे
२) टोमॅटो धुवून उकळत्या पाण्यात १ मिनीट घालून लगेच गार पाण्यात घालावेत म्हणजे टोमॅटोची साले सुटायला मदत होते. टोमॅटो सोलून घ्यावेत, आतील बिया नको असल्यास काढून टाकाव्यात. उरलेला गर मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी करावी.
३) पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि दालचिनी घालून ३० सेकंद परतावे. जिरे, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. लगेच आले-लसूण पेस्ट घालावी आणि परतावे.
४) नंतर कांदा घालून चांगला खरपूस परतावा. जर कांदा निट परतला नाही तर भाजीत आख्खे तुकडे दिसतात. तसेच कांदा परतताना मिठ घालू नये आणि झाकणही ठेवू नये. तेलावरच तो भाजला गेला पाहिजे. वाफेवर शिजवून आणि परतून या दोन्ही कृतींमुळे चवीत फरक पडतो.
५) कांदा परतला कि त्यात टोमॅटोची प्युरी करावी. मध्यम आचेवर झाकून शिजू द्यावे. गरजेपुरते पाणी घालावे. ३ ते ४ मिनीटांनी त्यात धणे-जिरेपूड, आमचूर पावडर आणि गरम मसाला घालावा. मिक्स करून एक दोन मिनीटे उकळी काढावी.
६) नंतर शिजवलेले राजमा बिन्स घालून ढवळावे, गरज वाटल्यास मिठ घालावे. मंद आचेवर राजमा २० मिनीटे शिजू द्यावा. ग्रेव्हीसाठी पाण्याचे प्रमाण कमीजास्त करावे.
गरम गरम भाताबरोबर राजमा करी खुपच चवदार लागते.
-http://chakali.blogspot.com/

पन्हे

दिड कप कैरीचा गर (कृती क्र. १)
२ कप साखर
१ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर

कृती:
१) साधारण एक मोठी कैरी (साधारण १ ते दिड पौंड) कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२) साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी (साधारण १/२ ते पाउण कप)घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी, कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.
http://chakali.blogspot.com/

गोडा मसाला

वाढणी: साधारण पाऊण किलो


साहित्य:
१/२ किलो धणे
१०० ग्राम जिरे
१०० ग्राम तिळ
१५० ग्राम सुके खोबरे
५ ग्राम काळी मिरी (साधारण १०-१२ मिरे)
५ ग्राम लवंगा (साधारण १०-१२ लवंगा)
५ ग्राम दालचिनी (४ इंचाच्या २ काड्या)
५ ग्राम तमालपत्र (५ ते ६ पाने)
१० ग्राम खडा हिंग
२ चमचे मिठ
१/४ कप तेल

कृती:
१) खोबरं किसून घ्यावे व कोरडेच खमंग भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे बाजूला एका ताटात काढून ठेवावे. तिळ आणि जिरे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. दोन्ही भाजताना आच मध्यम ठेवावी म्हणजे खोबरे किंवा तिळ जळणार नाही.
२) कढईत तेल गरम करून १० ग्राम खडा हिंग तळून घ्यावे व एका वाडग्यात काढून ठेवावे.
३) नंतर त्याच तेलात लवंग, दालचिनी, तमालपत्र, आणि मिरी वेगवेगळे तळून घ्यावे. हे मसाले बाजूला काढून घ्यावे.
४) उरलेल्या तेलात धणे चांगले खमंग भाजून घ्यावे.
५) तळलेले जिन्नस (लवंग, दालचिनी, तमालपत्र, आणि मिरी) खलबत्त्यात कुटून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक करावेत. धणे मिक्सरमध्ये बारीक करावेत. हिंग पूड होईस्तोवर कुटावे. जिरे मिक्सरमध्ये बारीक करावे. बारीक केलेले हे सर्व जिन्नस बारीक चाळणीतून चाळून घ्यावे. चाळणीत उरलेला जाडसर भाग परत कुटून घ्यावा आणि चाळावा.
६) भाजलेले खोबरे आणि तिळ वेगवेगळे कुटून अथवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
७) चाळलेल्या मिश्रणात भाजून कुटलेले खोबरे व तिळ मिक्स करावे. मिठ घालून निट मिक्स करून घ्यावे. तयार मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
-http://chakali.blogspot.com/

वेजिटेबल बिर्याणी


साहित्य:
१ कप बासमती तांदूळ
२ मध्यम कांदे उभे चिरून
१/२ कप मटार
५-६ फ्लॉवरचे तूरे अर्धा कप गाजर आणि फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांचे तुकडे सुद्धा घालू शकतो)
२ मध्यम टॉमेटोची प्युरी (टोमॅटो शिजवून त्याची साले काढावीत आणि मिकसरवर प्युरी करावी)
८-९ काजू बी
१ टेस्पून लसूण पेस्ट
१ टेस्पून आले पेस्ट
१/२ कप दूध
पाव ते अर्धा कप दही
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१ टेस्पून वेजिटेबल बिर्यानी मसाला
चवीपुरते मीठ
२ टेस्पून तेल

कृती:
१) तांदुळाच्या अडीचपट पाणी घेऊन त्यात १/२ चमचा तेल आणि पाऊण चमचा मीठ घालावे. त्यात तांदूळ घालावे. वरुन झाकण ठेवून तांदूळ शिजू द्यावे. (तांदूळ पूर्ण शिजवू नयेत. अगदी किंचित कच्चे ठेवावे) उरलेले पाणी काढून घ्यावे. आणि तयार भात परातीत मोकळा करून ठेवावा.
२) भाज्या अर्धवट शिजवून घ्याव्यात (गाजर, फारसबी, फ्लॉवर.. वगैरे)
३) नॉनस्टिक फ्राईंग पॅनमध्ये ३ चमचे तेल घेऊन त्यात कांदा, काजू बी, आले-लसूण पेस्ट घालावी. २ मिनिटे मंद आचेवर परतून त्यात टोमॅटो प्युरी घालावी. १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालून झाकण ठेवून वाफ काढावी. नंतर त्यात फेटलेले दही, बिर्याणी मसाला घालून ढवळावे. शिजवलेल्या भाज्या आणि थोडे मीठ घालावे.
४) दुसर्‍या नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा भाग शीजलेले तांदूळ पसरावे, त्यावर तयार ग्रेवी (टोमॅटो प्युरी आणि भाज्या) घालावी. आणि त्यावर उरलेला अर्धा भाग भात पसरावा.
५) १/२ कप दूध घालून मंद आचेवर १०-१२ मिनिटे वाफ काढावी. बिर्याणी तयार झाल्यावर त्यात कडेने तूप सोडावे.
-http://chakali.blogspot.com/

आप्पे

वेळ: मिश्रण भिजवायला १ तास + आप्पे बनवायला ३० मिनीटे
साधारण १५ ते १८ आप्पे

साहित्य:
३/४ कप जाड रवा
३/४ ते १ कप आंबट ताक
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून जिरे, ठेचलेले
३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५-६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१/२ टिस्पून आलेपेस्ट
२ चिमटी बेकिंग सोडा (खायचा सोडा)
१/४ कप तेल


कृती:
१) रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आलेपेस्ट, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
२) आप्पेपात्र गॅसवर गरम करत ठेवावे. मिश्रणात २ चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे. अप्पेपात्रातील प्रत्येक अर्धगोलात तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे. वरून झाकण ठेवून मिडीयम गॅसवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी. काट्याने (फोर्क) पलटून दुसरी बाजू थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी.
नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे. आप्पे थंड चांगले लागत नाही.
-http://chakali.blogspot.com/

Sabudana Vada


साहित्य:
२ वाट्या साबुदाणे
३ मध्यम आकाराचे बटाटे शिजवून
५-६ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा जीरे
अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
लिंबू
मीठ
वडे तळण्यासाठी तेल

कृती :
१) साबुदाणे पाण्यात भिजवावे...उरलेले पाणी काढून टाकावे. 3-4 तास भिजत ठेवावेत.
२) शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
३) मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
४) शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर बारीक करावेत.
५) भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
६) भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

खवलेला नारळ, मिरची, आणि कोथिम्बीरच्या चटणीबरोबर वडे छान लागतात.
-http://chakali.blogspot.com/

Chicken Biryani

  • Chicken 1/2 Kg
  • 2 tbsp. Curd
  • 1 tsp Turmeric powder
  • 3 tsp Chilly powder
  • 1 tspTandoori masala powder
  • Salt to taste
    For Rice
  • Basmati Rice- 3 Cups
    For Grinding
  • 4 Onions
  • 10 Green chillies
  • 12 Pods garlic
  • 1 sq " Ginger
  • 3 Tomatoes

Method

  • Marinate the meat in the marinading ingredients and keep aside (pref in Fridge) for about an Hour to 90 minutes.
  • Heat vegetable shortening or oil in a pan (3 tbsp). Add 4 cloves , 3-4 cinnamon sticks ,2 elaichis , and fry well .Add the ground paste and fry till oil comes up.Add the marinated chicken and fry . Cover for some time.
  • Then add the rice and fry. Add coriander and mint leaves and cook in the rice cooker.Add water just enough to submerge the rice and chicken.
  • Add water, close the pan and cook on low flame till rice is cooked.
Serve with Onion Raita.

गुरुवार, १६ जुलै, २००९

गुलाबजाम

साहित्य- खवा२५०ग्रँम, पनीर ५०ग्रँम, आरारोट पावडर५०ग्रँम, थोडे केशर,वेलची पुड १चमचा.
कृति- खवा, पनीर, आरारोट पावडर, वेलची पुड मिक्स करा. खवा त्याचे छोटे छोटे गोळे करुन
तूप गरम करुन ते छोटे गोळे लालसर रंगावर तळावेत. साखरेचा एकतारी पाक करुन छोटे गोळे पाकात टाकावेत

सफरचंद ड्रीम शेक

साहित्य : 2 सफरचंद, 2 कप दूध, 1 मोठा चमचा साखर, 1/2 चमचा वेलची पूड, कीस केलेले 1/2 सफरचंद, बर्फ चुरा आवश्यकतेनुसार.

कृती : किसलेल्या सफरचंदाला एका प्लेटमध्ये पसरवून फ्रीजमध्ये ठेवावे. दुसऱ्या सफरचंदाचे सालं काढून बिया काढून घ्याव्या. त्याचे तुकडे, दूध व साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घालून वर शेक भरावा. वरून किसलेले सफरचंद व वेलची पूड घालून सजवावे व सर्व्ह करावे.

बनाना शेक


साहित्य : दीड कप उकळलेलं थंड दूध, 1 केळ, 2 चमचे साखर, 5-6 बर्फाचे तुकडे, 4 स्कूप्स एक्टीबेस पावडर.

कृती : सर्वप्रथम केळीचे बारीक बारीक काप करून त्यात साखर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर दूध घालून चांगले फेटून घ्यावे. आता थोड्या शेकमध्ये एक्टीबेस पावडर घालून ते मिश्रण बाकीच्या शेकमध्ये घालून चांगल्या प्रकारे एकजीव करावे. सर्व्ह करताना ग्लासमध्ये शेक ओतून वरून बर्फाचा चुरा टाकावा.

मिल्क शेक


साहित्य : 1/2 लीटर दूध, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे पिठीसाखर, 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स.

कृती : थोडं गार दूध ठेवून बाकीचे तापवा. वेगळ्या ठेवलेल्या दुधात कॉर्नफ्लॉवर व साखरेची पेस्ट बनवून गरम दुधात घालून शिजवा. गार झाल्यावर त्यात इसेन्स, रंग, दोन केळी किंवा दोन चिकू किंवा एक मोठ्या आंब्याचा गर घालून बर्फाचा चुरा घालून मिक्सरमधून काढा. यात घुसळताना थोडं आइस्क्रीम घातले तर मिल्कशेक फारच टेस्टी बनेल.

गुरुवार, ९ जुलै, २००९

इंडियन ग्रेव्हीज

भारतीय स्वयंपाकाचा अविभाज्य भाग म्हणजे वाटण जे आजकाल ग्रेव्हीज म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या भागात जो पदार्थ पिकतो त्या पदार्थाचा त्या भागातल्या ग्रेव्हीमध्ये वापर केला जातो. टोमॅटो ग्रेव्ही, पालक ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही असे ग्रेव्हीचे चार बेसीक प्रकार आहेत. ग्रेव्ही जर आधीच व्यवस्थित बनवून ठेवल्यास 5 मिनिटांत हॉटेलसारखी भाजी बनवता येते. फ्रिज असल्यास ग्रेव्ही दहा बारा दिवस आधी बनवून ठेवता येतात. भारतातल्या प्रत्येक प्रांतानुसार इतकंच काय तर दर 50 किलोमीटर अंतरावर पदार्थांची चव बदलते. मसाल्याबरोबर शिजवण्याच्या पद्धतीवर ही पदार्थांची चव अवलंबून असते,
ग्रेव्हीचे प्रकार -

ब्राऊन ग्रेव्ही -
कांदा,आलं आणि लसूण.

रेड ग्रेव्ही -
टॉमेटो,आलं आणि लसूण.

ग्रीन ग्रेव्ही -
पालक,हिरवी मिरची,आलं,लसूण आणि कोथिंबीर .

व्हाईट ग्रेव्ही -
खवा आणि दूध.

* बेसिक व्हाईटचा उपयोग हा ग्रेव्हीला चकचकीत आणि घट्टपणा आणण्यासाठी होतो. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीत
* वापरू शकतो.
* छोले, दमालू, मसाल्याची वांगी, चिकन आणि फिश करी करण्यासाठी ब्राऊन ग्रेव्ही वापरतात.
* पालक पनीर, आलू पालक आणि पनीर पसंदा करण्यासाठी ग्रीन ग्रेव्ही वापरतात.
* पनीरच्या भाज्या आणि मलई कोफ्ता करण्यासाठी क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही वापरतात.


कांदा पावडर करताना - कांदा लांब चिरावा मग तेलात तळून मिक्सरमधून वाटून घ्यावा.

ग्रेव्हीज् फ्रिजमध्ये टिकतात.
भाजी तयार करताना मसाल्यात दूध किंवा पाणी मिसळून पेस्ट करावी

ड्राय ग्रेव्ही

धने जीरे पावडर - 1 चमचा
काजू पावडर -अर्धा वाटी
मीठ -चवीनुसार
कस्तुरी मेथी-अर्धा चमचा
हळद - छोटा अर्धा चमचा
पावडर -अर्धा चमचा
लसूण पावडर-अर्धा वाटी
तिखट - चवीनुसार
कांदा पावडर ( कांदा पातल लांब चिरून त्याची पूड करावी. मग कडकडीत तेलात तळून बारीक करा )

टीप्स-
1 ) ग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा.
2) काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे 1 वाटी मसाला वापरणार असलो..तर
साधारण 1 ते 2 चमचे भाजलेली कणीक वापरावी.

क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही - (पनीर बेस भाज्या / मलई कोफ्ता)

धने जीरे पावडर - 1 चमचा
काजू पावडर -अर्धा वाटी
मीठ -चवीनुसार
कस्तुरी मेथी - अर्धा चमचा
हळद - छोटा अर्धा चमचा
सुंठ पावडर-अर्धा चमचा
लसूण पावडर-अर्धा चमचा
दूध पावडर-1 वाटी
सायट्रीक ऍसिड-पाव चमचा
साखर -अर्धा चमचा
हळद तिखट-चवीनुसार

टीप्स-

* भाजी तयार करायच्या आधी मसाल्यात दूध किंवा पाणी मिसळून पेस्ट करून घ्यावी.
* पालकाची पेस्ट वापरून काही रेसिपीज् तयार करायच्या असतील तर त्यातही ही ग्रेव्ही वापरू शकता.


सांबार मसाला


जीरे - 1 चमचा
मेथी दाणे - पाव चमचा
काळी मिरी - पाव चमचा
हिंग - पाव चमचा
उडीद डाळ - 4 ते 5 चमचे
चणा डाळ -4 ते 5 चमचे
लाल मिरच्या - 7 ते 8
सुकं खोबरं - 5 चमचे

टीप्स -
तेलात सर्व मसाले भाजून (हळद सोडून) त्याचा पावडर मसाला बनवावा.
वेब साईट - www.vishnumanohar.net

शनिवार, ४ जुलै, २००९

तांबडा रस्सा ( मालवणी पद्धत )



१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे )
५ कांदे , ३ टमाटो , ५ पाकळ्या लसूण , आलं , लिंबाचा रस .
सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , मीठ लाल तिखट , हळद , तेल इ.

मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून १ तास ठेवावे.
कढई मधे तेल गरम करून त्यात प्रथम सुखं खोबरं लालसर भाजून घ्यावे मग त्यात लाल सुखी मिरची घालावी, मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात अख्खा गरम मसाला (धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र) घालावे. गार झाल्यावर मिक्सरमधून थोडं जाडसरंच वाटावे.( फार पाणी घालू नये ).
एका पितळी पातेल्यामधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे , कांदा चांगला लाल होत आला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालून अजून चांगले परतावे. मग त्यात बारेक चिरलेला टमाटो घालावा आणि हे सर्व मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत परतावे ( मग त्याचा एक खमंग असा सुवास येईल )
मग त्यात मटण घालून मटणाला पाणी सुटेपर्यंत ( होय !! मटणाला ह्ळू हळू पाणी सुटायला लागेल) परतत रहावे. अगदी गरज असल्याशिवाय बाहेरचे पाणी घालू नये.त्याच पाण्यात मटण लवकर शिजते.
मटण शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला घालून परत १० मिनीटे चांगले परतून मग त्यात पाणी घालावे. पाणी थोडं जास्तंच असू द्या.
चांगलं ऊकळल्यावर त्यात ओलं खोबरं आणी काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्यावी आणि घालावी. चवीप्रमाणे मीठ आणी लिंबाचा रस घालावा.

हैद्राबादी मटण बिर्याणी

हैद्राबादी मटण बिर्याणी


साहित्य :
मटण (मध्यम तुकडे केलेले) - १/२ कि.
बासमती तांदुळ (१/२ तास पाण्यात भिजवून) - १/२ कि.
कांदा (उभा चिरून) - १५० ग्रॅ. (साधारण मध्यम ४)
तमालपत्र - ४-५ पाने
लवंग - ५-६
शहाजिरे - १ चमचा
दालचिनी - ३ काड्या
काळी मिरी - ४-५
वेलदोडे - ३-४
पुदीना - २ कप चिरून
काजू - ५० ग्रॅ (optional)
दूध - २ चमचे
केशर - १/४ चमचा (वरील २ चमचे दुधात भिजवा)
साजूक तूप - १ १/२ कप

कृती :

(१)
आलं-लसूण पेस्ट - २ चमचे
शहाजिरे पावडर - १ चमचा
दालचिनी पावडर - १ चमचा
चवीपुरते मीठ
लाल तिखट - १/२ चमचा
हळद - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
हिरवी मिरची पेस्ट - २ चमचे
जिरे पावडर - २ चमचे
घट्ट दही - १ १/२ कप
ताजी कोथिंबीर बारीक चिरून - ३ कप
पुदीना बारीक चिरून - २ कप
एका भांड्यात मटणाचे तु़कडे घ्या. त्यात वरील पदार्थ टाकून छान मिक्स करून २ तास ठेवून द्या (मुरत ठेवा.)

(२)
दुसरीकडे कढईत थोडे तूप घ्या. त्यात चिरलेला कांदा ब्राउन खरपूस तळून घ्या. बाजूला ठेवा.
काजू असतील तर ते पण लाईट ब्राउन तळून घ्या.

(३)
एक मोठे जाड पातेले घेउन त्यात अर्धा कप तूप टाका.
तूप तापले की त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलदोडे टाका. ५ मिनिटे फ्राय होउ द्या.
त्यात मुरत ठेवलेले मटण टाका आणि मंद आचेवर मधेमधे मिश्रण हलवत रहा.

मिश्रण हलवता हलवता दुसरीकडे भिजवलेला तांदुळ अर्धवट शिजवा.
परातीत अर्धवट शिजलेला भात पसरून ठेवा. त्यावर थोडे तूप शिंपडा.

मटण बर्‍यापैकी (खूप नाही) शिजल्यावर ताटलीत काढून ठेवा.

(४)
भात आणि मटणाचे थर
ज्या पातेल्यात मटण शिजविले, त्यात थोडे ताटलीतले मटण घ्या.
त्यावर भाताच एक थर एकसारखा द्या.
त्यावर तूप, चिरलेला पुदीना, तळलेले काजू, दूधात भिजविलेले केशर शिंपडा.
भात आणि मटण संपेपर्यंत एक एक थर देत चला.
सगळ्यात वरती तळलेल्या कुरकुरीत तपकिरी कांद्याचा थर द्या.

(५)
थर लावून झाल्यावर लगेचच मंद आचेवर बिर्याणी तांदुळ शिजत येईस्तोवर (अंदाजे १५-२० मिनिटे) शिजत ठेवा.
जर पातेल्याचे झाकण घट्ट नसेल तर पातेल्याच्या किनारीला कणिक लावून झाकण घट्ट बंद करा.

(६)
दह्याचे रायते, कांदा, लिंबू, अंडी (उकडून अर्धी कापलेली) सोबत खायला द्या.

इडली सांबार


इडली : साहित्य- १ वाटी उडीद डाळ, २.५ वाट्या उकडा तांदूळ(जर्मनीत पार बॉइल्ड राईस म्हणून एक प्रकारचा तांदूळ मिळतो तो उकड्या तांदूळासारखाच असतो बराचसा..)मीठ,तेल,हवे असल्यास १ चमचा मेथी दाणे
कृती-उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला,७/८ तास.मेथी दाणे उडदाच्या डाळीत टाका. नंतर ते वेगवेगळेच बारीक वाटा आणि मग एकत्र करा.(तुमच्याकडे मिक्सर आहे ना,मग प्रश्नच मिटला,Smile)नंतर त्यात मीठ घाला(बेताचं हं,शेतातलं नाही,शेतात मीठ पिकत का कधी?)उबदार जागी ७,८ तास ठेवा.(उद्य्या पीठ फुगून येईल)
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा,इडली स्टँडला तेलाचा हात लावा व त्यात पीठ घाला.साधारण १५ मिनिटे एका घाण्याला लागतात.

सांबार : साहित्य-२ वाट्या तूर डाळ,२ ते ३ चमचे सांबार मसाला(मला एमटीआर सांबार पावडर आवडते),१ चमचा तिखट,१ लाल सुकी मिरची,१ मध्यम कांदा,१ लहान टोमॅटो,मुळा व दुधी भोपळयाच्या फोडी वाटीभर ,२ शेवग्याच्या शेंगा, हवा असल्यास १ लहान बटाटा, मीठ चवीनुसार,फोडणीचे सामान,कोथिंबिर सजावटीसाठी.१/२ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ,थोडा गूळ(ऑप्शनल)
कृती- डाळ शिजवून घ्या.डाळीबरोबरच शेंगाही शिजवा. तेलावर खमंग फोडणी करून घ्या,त्यात लाल मिरची ,कांदा घालून परता,सांबार मसाला व तिखट घालून परता. कांदा जरा गुलाबी झाला की इतर भाज्या घालून परता.शेंगा घाला. झाकण ठेवून एक वाफ आणा.चिंचेचा कोळ व डाळ घाला,पाणी घालून हवे तसे पातळ करा.उकळी आली की मीठ व हवा असल्यास गूळ घाला. खळखळून उकळू द्या. कोथिंबिर घालून सजवा.

तळलेले बांगडे


साहित्यः बांगडे, तेल, मीठ, कोकम रस, मिरचिपुड, तांदळाचे पीठ
पाककृती : बांगडे स्वच्छ धुवुन त्याना कोकम रस व मीठ लावून ठेवा.
तांदळाच्या पीठात मिरचिपुड घालुन मिक्स करा. या पिठात मासे
घोळवून गरम तेलात तव्यावर छान त़ळुन काढा.

खानदेशी शेव भाजी


साहित्यः

१ वाटी कांदा - उभा चिरून
१/२ वाटी सुके खोबरे
१ टेस्पु. पोहे
२-३ लसुण पाकळ्या (सोलून)
१ १/२ इंच आले
१ १/२ टि स्पु गरम मसाला
तिखट चवीनुसार
मिठ चवीनुसार
१/२ वाटी तेल
३-४ वाट्या गरम पाणी - मी अंदाजाने च टाकते.
१ वाटि तिखट शेव

कृति:
१) कांदा, १ टे स्पु. तेल घालुन भाजुन घ्यावा. कांदा चांगला तपकिरी रंगा चा भाजला गेला पाहिजे.
२) खोबरे सोनेरि रंगा वर भाजुन घ्या. तसेच पोहे पण थोड्या तेलात भाजुन घ्या.
३) कांदा + खोबरे + पोहे +आले + लसुण + गरम मसाला , पाणी घालून नीट बारिक वाटुन घ्या.
४) बाकिचे तेल पातेल्या त किंवा कढई त गरम करुन घ्या.
५) तेलात वरिल बारिक केलेले वाटण + तिखट टाका.
६) आता तेल सुटे पर्यंत मध्यम आचे वर परतवत रहा.
७) छान तेल सुट्ले पाहिजे नहितर चोथा पाणी होतो मसाला.
८) आता गरम पाणी , मिठ टाकुन मध्यम आचे वर उकळी यायला ठेवा.
९) जेवायच्या १० मिनिटे आधी तिखट शेव टाकुन वाढा.

टिपः
शेव खुप आधी टाकुन ठेवु नये नाहितर लगदा बनतो.
मस्त कांदा लिंबू घेउन खावे.

चटणी

पुदिन्याची चटणी

साहित्य : पुदिन्याची कोरडी पाने,1 वाटी निवडलेली कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 से.मी. लांबीचा आल्याचा तुकडा, मीठ, साखर.

कृती : पुदिन्याची निवडून धुऊन कोरडी केलेली पाने, वाटी भर निवडलेली कोथिंबीर, मिरच्या व आल्याचा तुकडा, चवीपुरते मीठ व साखर सर्व एकत्र करून वाटून चटणी करावी. ह्या चटणीच आवडत असेल तर 4-5 लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकतात.

कच्च्या टोमॅटोची चटणी
साहित्य : कच्च्या टोमॅटोच्या फोडी एक वाटी, 4-5 ओल्या मिरच्या, गूळ किंवा साखर, मीठ, ओले खोबरे, दाण्याचे कूट, लसणाच्या पाच-सहा पाकळ्या, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.
कृती : वरील सर्व साहित्य एक करून बारीक चटणी वाटावी आवडत असल्यास त्यावर फोडणी घालावी.

कोकम सार

साहित्य : 4-5 आमसूलं, 2 वाट्या गोड दही, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर, जिरंपूड 1 चमचा.

कृती : आमसुलांवर दोन कप गरम पाणी घालून ती दहा मिनीटं भिजवून ठेवावीत. दहा मिनिटांनी आमसुलं पिळून त्यात आणखी दोन कप पाणी घालावं. आता गोड दही घुसळून त्यात मिसळावं. जिरपूड, मीठ, साखर घालून नीट ढवळावं. या साराला वरून जिरं आणि मिरचीची फोडणी दिली तरी छान लागते.

राजमा


साहित्य : 11/2 कप राजमा रात्रभर भिजवून निथळू घेतलेले, 5 ग्रॅम आले, 6 पाकळ्या लसूण, 1/4 कप वनस्पती तेल, 2 अख्ख्या लाल सुक्या मिरच्या, 1 मोठा कांदा किसलेला, 1 1/2 टोमॅटो चिरलेले, 1/2 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, 2 कप पाणी, गरम मसाला 1 चमचा.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मिरच्या घाला, कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. आले आणि लसणाचे पेस्ट करून ते घाला व थोड्या वेळ परता. टोमॅटो, मिरची पूड आणि मीठ घाला. मधून मधून ढवळत राहा, टोमॅटोचा गळेपर्यंत शिजवा नंतर त्यात राजमा आणि पाणी घालून कुकर बंद करा, व कमी आचेवर 20 मिनिटे शिजवा. कुकर उघडा व पळीच्या मागच्या बाजूने राजमा सायीसारखा मुलायम होईपर्यंत थोडा ठेचा. गरम मसाला पूड टाकून ढवळा. गरम गरम वाढा.

व-हाडी मटण



साहित्य ः

एक किलो मटण,
250 ग्रॅम शेंगदाणा तेल,
250 ग्रॅम कांदे, 200 ग्रॅम लसूण,
125 ग्रॅम आले, 250 ग्रॅम खोबरे,
125 ग्रॅम खसखस, 10 ग्रॅम वेलदोडे,
100 ग्रॅम धने, जीरे मीरे, हिरवी कोथिंबीर
125 ग्रॅम शुद्ध गरम मसाला, 100 ग्रॅम लाल मिरची पावडर,


पूर्वतयारी ः

मटणाचे आपल्या सोयी‍नुसार तुकडे करून घ्यावे.
गरम पाण्याने मटण चांगले धुवून घ्यावे.
मटण अँल्यूमिनियमच्या पातेल्यात उकडण्यासाठी ठेवावे.
इलायची बारीक वाटून घ्यावी.
खोबरे, खसखस, जीरे भाजून घेऊन मिक्सरमधून काढून घ्यावे.
कांदे बारीक कापून तव्यावर भाजून बारीक पेस्ट करावी.
लसूण पाकळ्यांची पेस्ट करावी. गरम मसाला वाटून घ्यावा.


कृती ः

सर्वप्रथम कढईत सर्व प्रकारचा मसाला भाजून घ्यावा. कढईत शेंगदाणा तेल घालून कांदा, लसूण, आले, वाटलेला गरम मसाला, खोबरे, खसखस पेस्ट भाजून घ्यावी.

संपूर्ण मिश्रण तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे. मिश्रण भाजल्यानंतर फोडणी देण्याकरिता गॅसवर अँल्यूमिनियमचे पातेले ठेवून त्यात शेंगदाणा तेल घालावे.

तेल तापल्यानंतर मसाल्याचे भाजलेले मिश्रण घालावे. मिरची पावडर सोडून तेलात चांगली भाजून घ्यावी. उकडण्यास ठेवलेले मटण शिजल्याची खात्री करून घ्यावी. गॅसवर पातेले ठेवून त्यात भाजलेले तेल घालावे.

तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर त्यात कढईत भाजलेले मिश्रण घालावे. मिश्रणात मटण टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. हिरवी कोशिंबीर व मटणाचा गरम मसाला घालून पातेल्यावर झाकण ठेवावे.

ही सर्व प्रकिया गॅसच्या मंद आचेवर करावी. पाच मिनिटानंतर झाकण काढूण गरम केलेले पाणी त्यात घालावे. मटणाचा रस्सा जास्त घट्ट किवा पातळ होऊ नये याची काळजी घ्यावी.

मसालेदार बिर्याणी


लागणारे जिन्नस:
एक किलो बासमती तांदूळ, एक किलो चिकन, 250 ग्रॅम रिफाइंड तेल, 500 ग्रॅम चिरलेले कांदे, 500 ग्रॅम चिरलेले टोमॅटो, एक कप दही, 10-15 लांबट कापलेल्या हिरव्या मिरच्या, पाच-पाच ग्रॅम दालचिनी, वेलची, लवंग, एक मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, दोन लीटर पाणी, चवीनुसार मीठ.

करावयाची कृती:
तांदूळ स्वच्छ करून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. चिकनचे मोठं-मोठे तुकडे करून घ्या. आवश्यक मात्रेत तेल गरम करून त्यात कांदे परतवा. नंतर त्यात हिरवी मिरची, दालचिनी, लवंग टाकून भाजून घ्या. कांद्याला सोनेरी रंग आल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाका. चिकनचे तुकडे, दही, मीठ टाका. चिकन शिजू द्या. तांदूळ आणि आवश्यकतेनुसार जवळपास दोन लीटर पाणी टाकून शिजू द्या. व्यवस्थित मिक्स करून झाकण बंद करून तांदूळ शिजू द्या.

चायनिज पुलाव


500 ग्रॅम बासमती तांदूळाचा भात, 125 ग्रॅम पत्ताकोबी, कांद्याची पात, 2 गाजर, 1/2 वाटी हिरवे मटार उकळलेले, 10-15 मशरूमचे टुकडे, 1/2 पाकीट सिजनिंग, 2 मोठे चमचे सोया साँस, अजीनोमोटो, 2 मोठे चमचे रेड चीली साँस, 250 ग्रॅम मटनाचे तुकडे, तळण्यासाठी तेल, 2 सिमला मिरच्या.

कृती- एका कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात सर्व भाज्या चिरून टाका व उकळलेले मटर टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यात मटनाचे तुकडे, सोया साँस, चिली साँस, स‍िजनिंग, मशरूमचे तुकडे, चवीनुसार अजिनोमोटो टाकून मिक्स करा. नंतर त्यात तयार भात घालून मिक्स करा.

गरम गरम पुलाव टोमॅटो किंवा चिली साँस टाकून सर्व्ह करा.

बांगडा करी



साहित्य : ४ ते ६ मध्यम आकाराचे बांगडे. अर्ध्यापेक्षा थोडा कमी नारळ किसून, ६ ते ८ पाकळ्या लसूण, १" आले, १०-१२ कढीलिंबाची पाने, १० - १२ काश्मिरी मिरच्या, एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरून, एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून, अर्धा चमचा हळद, एक टी स्पून कसूरी मेथी पावडर, लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ, अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर, मुठभर कोथिंबीर. १०-१२ तिरफळे, मिठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल.

कृती :
बांगडे विकत घेताना घट्ट शरीराचे, डोळे चमकदार असणारे घ्यावेत.

बांगडे साफ करून, स्वच्छ धूवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावेत. प्रत्येक बांगडा दोन्ही पंजांमध्ये धरून किंचीत दाबून पाणी काढून टाकावे. बांगड्यांचे डोके काढून टाकून फेकून द्यावे. उरलेल्या बांगड्याला हलक्या हाताने, दोन्ही बाजूंनी तिरप्या चिरा देऊन, आकारानुसार प्रत्येकी २ ते ३ तुकडे करावेत. या सर्व तुकड्यांना हळद आणि थोडे मीठ लावून ठेवावे.

काश्मिरी मिरच्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. मिक्सरच्याच मोठ्या भांड्यात नारळ, आलं-लसूण, काश्मिरी मिरच्यांचे तिखट, कांदा, टोमॅटो, कसूरी मेथी पावडर, चिंचेचा कोळ, गरम मसाला पावडर, कोथिंबीर एकत्र घालून, कमी पाण्यात, गंधासारखे मऊ वाटावे. सर्वात शेवटी तिरफळे घालून दोन-चार फेरे फिरवावेत.

एखाद्या पसरट पातेल्यात अर्धी वाटी तेल घालून गरम करावे. त्यात कढीलिंबाची पाने टाकावीत. ती तडतडली की मिक्सरमधील, गंधा सारखा, वाटून ठेवलेला मसाला टाकावा. गॅस मध्यम आंचेवर ठेवून मसाला परतत राहावे. सुरूवातीला मसाला सर्व तेल शोषून घेईल. शेवटी मसाला शिजून त्याला चारीकडून तेल सूटू लागेल. रंग लाल भडक आणि चमकदार होईल. मग त्यात गरजे इतके पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकावे. मसाला नीट मिसळून घ्यावा. झाकण ठेवून करीला उकळी आणावी. उकळी आल्यावर हळद आणि मीठ लावून ठेवलेले बांगड्याचे तुकडे त्यात सोडावे. गॅस पुन्हा मध्यम आंचेवर करून करीला चांगली १ -२ उकळी आणावी. बांगडे शिजले की गॅस बंद करावा. करीचे तपमान जरा उतरले की कोथिंबीर भुरभुरून बांगडा करी जेवणात घ्यावी.

मसालेदार चिकन बिर्याणी


लागणारे जिन्नस :
एक किलो चिकन, एक किलो बासमती तांदूळ, एक पाव रिफाइंड तेल, अर्धा किलो चिरलेले टोमॅटो, एक कप दही, 10 ते 15 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), पाच-पाच ग्रॅम दालचिनी, वेलची, लवंगा, एक मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, दोन लीटर पाणी, चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. चिकनचे तुकडे करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कांदा टाकून परता. नंतर हिरवी मिरची, वेलची दाणे, दालचिनी, लवंग टाकून भाजून घ्या. मीठ टाकून चिकन थोडे शिजू द्या.

नंतर तांदूळ पाणी घालून शिजत ठेवा त्यात सर्व मिश्रण व्यवस्थित घालून हालवून घ्या. झाकण लावून तांदूळ शिजवून घ्या. गरमा-गरम चिकन बिर्याणी सर्व्ह करा.

चटपटी फिश करी

साहित्य :
250 ग्रॅम मासे, आले, 6-7 हिरव्या मिरच्या, 7-8 कांदे, 1 चमचा लाल तिखट, एक चिमुट हळद, कोथिंबीर, 4 काड्या कढीपत्ता, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पूड, टोमॅटो प्युरी, अर्धा लीटर नारळाचे दूध.

कृती: मिरची, आले, कांदे, तिखट, कोथिंबीर वाटून घ्या. मासे धुऊन तयार केलेल्या मसाल्यात मिसळा. दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या. एका कढईत तेल गरम करून त्यात त्यात कढीपत्ता आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात मसाला लावलेले मासे टाका. मासे शिजवून घ्या.

दुसर्‍या कढईत नारळाचे दूध अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. नंतर त्यात तयार केलेले मासे घालून परतून घ्या. मासे दुधात पूर्ण शिजल्यावर त्यात आमचूर पावडर टाकून गॅसवरून उतरवून घ्या. तयार आहे चटपटी फिश करी.

चिकन करी


साहित्य : चिकन, कढीपत्ता, 3-4 हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, 2 टोमॅटो, 2 कांदे, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ

कृती: सर्वप्रथम चिकन शिजवून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता घाला. तसेच चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट टाका. मसाला तेल सोडू लागल्यावर त्यात थोडे पाणी टाका. शिजलेले चिकन टाकून आवश्यतेनुसार पाणी टाका. गरमा-गरम चिकन करी सर्व्ह करा.

अंडा करी


लागणारे जिन्नस:
दोन अंडी उकळलेले, उकळलेले दोन बटाटे, अर्धा चमचा जिरे, दोन तेज पान, दोन लाल मिरच्या, चार लवंग, वेलची, दालचिनी, बारीक चिरलेले दोन कांदे, किसलेले दोन टोमॅटो, एक चमचा आलं-लसूण पेस्ट.

मसाला: अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पूड, एक चमचा लाल मिरची पूड, एक चमचा गरम मसाला, एक चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, एक चमचा देशी तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू, एक चमचा खसखस, एक चमचा तीळ हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या.

करावयाची कृती: अंड्याचा वरील भागात चाकूने क्रॉस करून घ्या. बटाटे दोन भागात कापून घ्या. कढईत तेल गरम करून बटाटे हलक्या रंग येईपर्यंत तळून घ्या. आता फोडणीसाठी वेगळे तेल गरम करून कांदा टाका आणि सोनेरी रंग होईपर्यंत तळा. नंतर टोमॅटो, आले-लसूण पेस्ट टाका, लाल मिरची, गरम मसाला टाका आणि मसाला तेल सोडेपर्यंत शेका. काजूचे पेस्ट टाकून हालवा आणि एक कप पाणी टाका. आता बटाटे आणि अंडे टाकून पाच मिनिटे झाकून ठेवा. नंतर उतरवून घ्या. कोथिंबीर टाकून सजवा आणि गरमागरम पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

गुरुवार, २ जुलै, २००९

सिंधी कढ़ी


सिंधी कढ़ी


विधि :

1. सबसे पहले दो टेबलस्पून तेल को गर्म करके उसमें बेसन मिलाइए। इसे 10-15 मिनट तक भूनिए, जब तक ये थोड़ा सा गहरे रंग का न हो जाये और इसमें से खुशबू न आने लगे।

2. अब इसमें हल्दी, नमक और चार गिलास पानी मिलाइए। इसे हिलाते हुए उबालिए।

3. अब एक अलग बर्तन में सहजन, भिंडी, आलू, गोभी और बैंगन को बड़े टुकड़ों में काटकर फ्राई कर लें। जब ये थोड़े से पक जाएं तो इन्हें कढ़ी में मिला दीजिए। साथ ही टमाटर काटकर कढ़ी में डाल दीजिए।

4. अब कढ़ी को तब तक उबलने दीजिए, जब तक सब्जियां पूरी तरह से पक न जाये। फिर इसमें इमली का रस मिलाइए।

5. अब पैन में तेल गर्म करके उसमें हींग, राई, जीरा, मेथी दाना, कलौंजी, लाल मिर्च और करी पत्ता डालिए। जब तड़का तैयार हो जाये तो इसे कढ़ी में डाल दीजिए। अब कढ़ी को कटी हरी धनिया से सजाकर गरमागरम चावल के साथ परोसे।


सामग्री :

3 टेबलस्पून बेसन, 4 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून पिसी हल्दी, 5 गिलास पानी, 2 टीस्पून इमली का रस, 2 टमाटर, 250 ग्राम भिंडी, 3 आलू, 1 छोटा सा बैंगन, 250 ग्राम फूलगोभी, सहजन की दो फलियां, नमक स्वादानुसार, 1 टीस्पून राई, 1टीस्पून जीरा, 1 टीस्पून पिसी लाल मिर्च, 1टीस्पून कलौंजी, 1 टीस्पून मेथी दाना, थोड़ा सा करी पत्ता, 2-3 हरी मिर्च, थोड़ा सा हरा धनिया।

कितने लोगों के लिए : 3