शनिवार, ४ जुलै, २००९

व-हाडी मटण



साहित्य ः

एक किलो मटण,
250 ग्रॅम शेंगदाणा तेल,
250 ग्रॅम कांदे, 200 ग्रॅम लसूण,
125 ग्रॅम आले, 250 ग्रॅम खोबरे,
125 ग्रॅम खसखस, 10 ग्रॅम वेलदोडे,
100 ग्रॅम धने, जीरे मीरे, हिरवी कोथिंबीर
125 ग्रॅम शुद्ध गरम मसाला, 100 ग्रॅम लाल मिरची पावडर,


पूर्वतयारी ः

मटणाचे आपल्या सोयी‍नुसार तुकडे करून घ्यावे.
गरम पाण्याने मटण चांगले धुवून घ्यावे.
मटण अँल्यूमिनियमच्या पातेल्यात उकडण्यासाठी ठेवावे.
इलायची बारीक वाटून घ्यावी.
खोबरे, खसखस, जीरे भाजून घेऊन मिक्सरमधून काढून घ्यावे.
कांदे बारीक कापून तव्यावर भाजून बारीक पेस्ट करावी.
लसूण पाकळ्यांची पेस्ट करावी. गरम मसाला वाटून घ्यावा.


कृती ः

सर्वप्रथम कढईत सर्व प्रकारचा मसाला भाजून घ्यावा. कढईत शेंगदाणा तेल घालून कांदा, लसूण, आले, वाटलेला गरम मसाला, खोबरे, खसखस पेस्ट भाजून घ्यावी.

संपूर्ण मिश्रण तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे. मिश्रण भाजल्यानंतर फोडणी देण्याकरिता गॅसवर अँल्यूमिनियमचे पातेले ठेवून त्यात शेंगदाणा तेल घालावे.

तेल तापल्यानंतर मसाल्याचे भाजलेले मिश्रण घालावे. मिरची पावडर सोडून तेलात चांगली भाजून घ्यावी. उकडण्यास ठेवलेले मटण शिजल्याची खात्री करून घ्यावी. गॅसवर पातेले ठेवून त्यात भाजलेले तेल घालावे.

तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर त्यात कढईत भाजलेले मिश्रण घालावे. मिश्रणात मटण टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. हिरवी कोशिंबीर व मटणाचा गरम मसाला घालून पातेल्यावर झाकण ठेवावे.

ही सर्व प्रकिया गॅसच्या मंद आचेवर करावी. पाच मिनिटानंतर झाकण काढूण गरम केलेले पाणी त्यात घालावे. मटणाचा रस्सा जास्त घट्ट किवा पातळ होऊ नये याची काळजी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा